Breaking News

जमिनीच्या वादातून जबर मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - तालुक्यातील लिंपणगाव येथे जमिनीच्या वादातून चुलत भावांमध्ये मारामारी केली.  जबर मारहाण झाल्याने त्यातील एकाला पुणे ये:थील कमला हॉस्पिटल तर दुसर्‍याला ससून हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  या घटनेची  पुणे येथील पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. परंतु संबंधित घटना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील असल्याने तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. 
श्रीगोंदा तालुक्यातील लीपणगाव या ठिकाणी विजय तुकाराम ठोमसंकर याच्या वडिलोपार्जित  मालकीची शेतजमीन गट न 385 मध्ये 76 आर जमीन आहे.  विजय  ठोमसंकर हे  पुण्यात राहत असल्यामुळे आजपर्यंत ती जमीन त्याचे चुलत बंधू रावसाहेब  ठोमसंकर सुरेश  ठोमसंकर हे कसत होते.  परंतु काही कालावधी नंतर त्यांनी आपली जमीन स्वतः क रण्याचा विचार केला.  परंतु  त्याच्या चुलत भावांनी त्याने त्या ठिकाणी येऊ दिलेच नाही मग विजय तुकाराम ठोमसंकर यांनी याबाबत अहमदनगर जिल्हा न्यायालयात दावा दाखल  केला होता..  त्यांनी आणि रावसाहेब ठोमसंकरनी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली.  विजय तुकाराम ठोमसंकर याच्यासह उमेश पप्पू कदम, संकेत विशाल कांबळे यांनाही  मारहाण करण्यात सुरवात केली.  काही वेळातच विजय तुकाराम ठोमसंकर याचे चुलत बंधू विलास आणि रमेश त्या ठिकाणी धावत आले व त्यांनीही मारहाण करण्यास सुरवात के ली.  त्याच्यासोबत इतर 5 - 6 जण त्याठिकाणी येऊन विजय तुकाराम ठोमसंकर याना मारहाण करू लागले.  त्यातील एकाने मोटारसायकल अंगावर चढवल्याने संकेत कांबळे  याचे पाय मोडले तर बाकीच्यांनी विजय तुकाराम ठोमसंकर याच्या अंगावर काचेच्या बाटल्या फेकून जखमी केले.  जखमींवर  उपचारासाठी पुणे येथील ससून आणि कमला नेहरू  हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले  आहेत.  प्रकरणाबत पोलिसांनी जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. परंतु संबंधित घटना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील  असल्याने तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.