Breaking News

सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे - देठे

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - बलिप्रतिपदेच्या औचित्यावर बळिराजाला अभिवादन करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या आत्महत्येस राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने शुक्रवारी पारनेर शहरातुन भव्य मिरवणुक काढली .  संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर , प्रदेश प्रवक्ते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली  पारनेर पोलिस स्टेशनसमोर निषेःध सभा घेऊन पारनेरचे पोलीस निरिक्षक हनुमंतराव गाडे यांना लेखी निवेदन दिले.
शेतकर्‍यांच्या आत्महत्येस व कर्जबाजारीपणास राज्य सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याने व सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी देखील फसवी असल्याने सरकारच्या  विरोधात फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाची पारनेर शहरातुन भव्य मिरवणूक काढली , मिरवणुकीचा प्रारंभ  पारनेर येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आला.  मिरवणुक पारनेरच्या  मुख्य बाजारपेठेतुन पारनेर पोलिस स्टेशन पर्यंत काढण्यात आली. 
या वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पारनेर शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले मिरवणुकीत सहभागी झालेल्या शेतकरी सुपुत्रांच्या हातात  सरसकट कर्जमाफी मिळावी , डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात , सरकारवर गुन्हे दाखल करावेत या मागण्यांचे फलक व संघटनेचे झेंडे होते.
मिरवणुक पारनेर पोलीस स्टेशनवर आल्यावर सभेत रूपांतर झाले. सभेस संबोधित करताना संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी  सरकारच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर  निषेध करत सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी दीड लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याची भुमिका घेतल्यामुळे व त्यासाठीही जाचक अटी व निकष लावल्यामुळे  राज्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय केला आहे.
सरकारचा कारभार हा अतिशय भोंगळ व अनागोंदी असुन हे सरकार प्रत्यक्षात कृति करण्याऐवजी जाहिरातबाजीवरच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप केला.
 सरकार शहरी व ग्रामीण नागरिक असा भेदभाव करत असुन राज्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंतच तुटपुंजी मदत जाहीर करून  शेतकर्‍यांची बोळवण करत आहे. 
सरकारची एकंदरीत वाटचाल हि लोकशाहीकडुन हुकुमशाहीकडे असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वेळी संघटनेचे राज्य सचिव किरण वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गागरे, संजय भोर, नंदू साळवे, संदिप जाधव, विकास रोकडे, संतोष क ोरडे, सुदाम कोरडे, रामदास देठे, रोहिदास खोडदे, संजय भोर, संतोष गागरे, भानुदास देठे, सोपान वाडेकर, शुभम टेकुडे, संकेत भोर, प्रविण भोर, रामदास साळवे, गणेश शिंदे,  गणेश भोर, किरण खाडे, भागवत आतकर, रामकृष्ण पवार, सचिन शेळके, पांडुरंग पडवळ, बाळासाहेब निवडुंगे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.