Breaking News

अपंग कर्मचार्‍यांनी आदिवासी वसतिगृहात साजरी केली वंचितांची दिवाळी

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - दिवाळीच्या पहील्या दिवशी अपंग कर्मचारी यांच्या वतीने वंचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. अपंग कर्मचारी जिल्हा बुलडाना यांच्या रवतीने  संग्रामपूर तालुक्यातील भिंगारा येथील जि. प. च्या आदिवासी निवासी विद्यार्थी वसतिगृह येथे विद्यार्थी हिताच्या शैक्षणिक दृष्टिकोणातून 25 गाद्या व बेडसिट जि. प. मुख्याकार्यकारी  अधिकारी शणमुखराजन यांच्या स्वाधीन करण्यात आले. 
वंचित आदिवासी मुलांची दिवाळी आनंदात साजरी होईल व एक सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न अपंग कर्मचारी बांधवानी केला आहे.
यावेळी अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार व अपंग कर्मचारी बांधव यांनी मुख्याकार्यकारी अधिकारी  शणमुखराजन व उपशिक्षण अधिकारी वराडे साहेब अकाळ  साहेब आंधळे साहेब यांच्या समक्ष सदर मदत सुपुर्द केली मान्यवरांनी अपंग कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना खुप चांगली मदत करून चागले काम केल्याबद्दल मनापासुन समाधान व्यक्त  केले. तर वंदन पेरत्या हातांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित राहण्याचे आवाहन लोकजागर परिवाराने केले आहे.