Breaking News

किनगांव राजा पोलिसांची 145 लक्झरी बसेसवर धडक कारवाई; 2,05,400 रुपयांचा दंड वसूल

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - पोलीस स्टेशन किनगांव राजाचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उप विभागीय पोलिस अधिकारी नलावडे यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली दि.16 ऑक्टोबरच्या रात्री दुसरबीड येथे जुना टोलनाका येथे दिपावली सणानिमित्त विशेष नाकाबंदी आयोजन  करण्यात आले होते. दिपावली सण जनतेच्या शांततेने तसेच भयमुक्त वातावरणात होण्याचे दृष्टीकोनातून व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या आदेश प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून पोलीस  स्टेशन स्तरावर दुसरबीड येथे 16 ऑक्टोबरच्या रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अनेक लक्झरी बसेस प्रवाशांची ने-आण करतात. सणासुदीच्या सदरच्या खाजगी लक्झरी बसेस  ह्या प्रवाशांकडून जास्त तिकिटाचे पैसे वसूल करतात. तसेच परवान्यांपेक्षा जास्त अवैध प्रवासी वाहतूक करतात. परंतु प्रवाशांची ही होणारी पिळवणूक तसेच लक्झरी बसेचेची दंडे  लीला लगाम घालून त्यांचेवर रात्र भर चालणार्‍या लक्झरी बसेस व मोटार वाहन कायद्याखाली कलम 66(1) 192 कलाम कलामन्वये एकूण 97 लक्झरीवर केसेस करून त्यांचे क डून 1,92000 तसेच इतर वेगवेगळ्या कलामन्वये 49 लक्झरी वाहनावर कार्यवाही करून त्यांचेकडून 13,400 अशा एकूण 145 लक्झरी वाहनांवर मोटार वाहन करून कलामन्वये  धडक कार्यवाही करून 2,05400 चा दंड वसूल केला. तसेच एक लक्झरी वाहन चालकांवर कलम 110/117 महाराष्ट्र अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरच्या धडक कार्यवाहीमध्ये पोलीस स्टेशन किनगाव राजाचे ठाणेदार सेवानंद वानखडे, दुय्यय ठाणेदार किशोर शेरकी, पोहेकॉ अशोक मांन्टे, पोहेकॉ शेषराव सरकटे, पोहेकॉ  दत्तात्रय लोंढे, नापोकॉ भगवान काकड, नापोकॉ खाडे, नापोकॉ विनोद राजपूत, नापोकॉ गणेश बांडे, पोकॉ विष्णू सानप, पोकॉ नाजूकराव वानखडे, पोकॉ.तेजराव भोकरे,  पोकॉ  श्रवण डोंगरे, पोकॉ. गजानन सानप, पोकॉ. विनायक मोरे, मपोकॉ गीता सावलवर, मपोकॉ मीना भिलावेकर यांनी प्रत्यक्ष भाग घेवून अथक परिश्रम घेवून विशेष नाकाबंदी यशस्वी के ली.