Breaking News

बनावट नोटा तयार करणार्याला मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीडमध्ये अटक

बीड, दि. 27, ऑक्टोबर - मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी आज शहरात एके ठिकाणी धाड टाकून दीड लाखांच्या बनावट नोटांसहीत साहित्य जप्त केले असून या  घटनेने खळबाळ उडाली आहे. नोटाबंदीनंतर मराठवाडयात घडलेली तिसरी घटना आहे.
बीड शहरातील गांधीनगर भागातील सय्यद शुकुर शब्बीर नामक व्यक्ती बनावट नोटा बनवत असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी बीड पोलिसांशी  संपर्क साधला. त्यानंतर बीड पोलिसांनी सावधपणे शेख शकूर याच्या घरावर धाड टाकून बनावट नोटा बनविण्याच्या साहित्यासहित दीड लाखांच्या 50 आणि 100 रुपयांच्या बनावट  नोटा जप्त केल्या. तो त्याच्या घरी 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा तयार करत होता.सध्या तो बीड पोलिसांच्या ताब!ात आहे त्याच्या बरोबर आणखी काही साथीदार  असण्याची शक्यता असून याच्या मध्य प्रदेश कनेक्शनचाहि शोध घेण्यात येणार आहे.