Breaking News

संपात सहभागी राहिलेल्या एसटी कामगारांचे महिन्याचे वेतन कापणार?

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - संपात सहभागी होऊन चार दिवस गैरहजर राहिलेल्या एसटी कामगारांना 28 दिवसांच्या वेतनावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा  महामंडळातील कामगारांत सुरू आहे. मात्र अदयाप तरी औरंगाबाद विभाग नियंत्रकांनी अद्याप वेतन कपातीचे पत्रक काढलेले नाही. जळगाव विभाग नियंत्रक कार्यालयाकडून संपाच्या  काळात असलेल्या कामगारांचे वेतन कापण्याचे आदेश काढले असल्याचे समजले.
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप केला. महामंडळाच्या 2005 च्या परिपत्रकानुसार कामगारांनी एक  दिवस संप केला, तर सात दिवसाचे वेतन कापण्याचे धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार चार दिवसांच्या संपामुळे कामगारांचे 28 दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे. चार  दिवस संप केला असल्याने चार दिवसांचेच वेतन कापावे महिन्याचे वेतन कापु नये अशी कामगारांची भूमिका आहे.