Breaking News

कितीही धमक्या आल्या तरी आंदोलन करतच रहाणार; अण्णा हजारेंचा निर्धार

मुंबई, दि. 16, आक्टोबर - मी गेली 40 वर्षे समाज व देशासाठी आंदोलने करत आहे. या काळात 12 वेळा मला जिवे मारण्याची धमकी मिळाली. असे असले तरी जोपर्यंत मी  जिवंत आहे तोपर्यंत समाज व देशाला अडथळे निर्माण करणा-यांच्या विरोधात आंदोलन करतच रहाणार, असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. फेसबूक  लाईव्हवरून श्री. हजारे यांनी जनतेशी संवाद साधला.
मी गेल्या 40 वर्षांत आंदोलने करताना मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. समाज व देशासाठी मी आंदोलन करतो ते पक्ष व त्यांच्या नेत्यांना पटत नाही. लोकपाल क ायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर होऊनही तो अद्याप अंमलात आलेला नाही. या संदर्भात मी वेळोवेळी स्मरणपत्रे लिहित आहे. मात्र मला फसवले जात आहे, असा आरोपही  श्री. हजारे यांनी केला.