Breaking News

जीएसटी’तील विसंगती दूर न केल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका - यशवंत सिन्हा

अकोला, दि. 16, आक्टोबर - वस्तू व सेवा करामध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणा-या असून यातील विसंगती लवकर दूर न केल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण  होऊ शकतो, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज येथे व्यक्त केले. ते शेतकरी जागर मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
वस्तू व सेवा कर म्हणजे ॠगुड ण्ड सिंपल टॅक्स नाही. तर आता अतिशय जटील व गुंतागुंतीचा झाला आहे. राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज असून याची सुरुवात  अकोल्यातून करण्यात येणार आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. नोटा रद्दचा निर्णय पूर्णत: अपयशी ठरला. नवीन रोजगार थांबले असून आहेत ते कर्मचारीही कमी केले जात  आहेत. आकडेवारीच्या खेळाने देशाचे भले होणार नाही. यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे स्वरूप महत्त्वाचे आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.