कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचे निधन
नगर, दि. 16, आक्टोबर - श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या यांचे आज सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोयंबटूर येथे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 9 वाजता कुकडी कारखान्याजवळ अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राहुल जगताप यांचे ते वडील होते. गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्यावर कोयंबटूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सदस्य व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक होते.