Breaking News

घुसर बु. ग्रामपंचायतच्या कारभारात सरपंच पतीची लुडबुड

राजकीय द्वेषभावनेतून विरोधकांवर सुड; गटविकास अधिकार्‍यांंकडे तक्रार  

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - मोताळा तालुक्याती घुसर बु. ग्रामपंचायतीकडून राजकिय सुडभावनेतून विरोधकांना त्रास देण्याचे सत्र सुरु असल्याची तक्रार दरुबाई भिकाजी वानखेडे यांनी गटविकास अधिकारी पं.स.मोताळा यांच्याकडे केली आहे. 
दि.8 सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारित त्यांनी नमुद केले आहे कि, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माझ्या नावाने घरकूल मंजूर झाले आहे. माझ्या नावाने मालकिय जागा नसल्यामुळे गावात लागून असलेल्या व मी राहत असलेल्या माझ्या मालकिच्या शेतीचा सातबारा प्रस्तावासोबत जोडला. त्यानुसार घरकुलाचा पहिला हप्ता 30 हजार रुपये मला मिळाले. त्यानंतर माझ्या शेतातील उभे पिक उपटून मी शेतात लेंटल लेवल पर्यंत घराचे बांधकाम केले. घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाब मी अनेकदा ग्रामपंचायत सरपंच पती यांना विनंती केली. परंतु घरकुल हे सरकारी जागेत बांधले आहे त्यामुळे पुढील हप्ते मिळणार नाही असे सांगण्यात आले. घर स्वत:च्या मालकिच्या शेतात बांधले आहे. परंतु वास्तुस्थिती अशी आहे कि, लाभार्थी दरुबाई वानखेडे यांची मुलगी व सुन यांनी सत्तारुढ पॅनलच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्याचा राग मनात ठेवून राजकिय सुड भावनेतून अधिकार पदाचा गैरवापर करुन ग्रा.प.कडून त्रास देणे सुरु आहे. ग्रा.प.घुसर बु. चे सरपंच पद हे अनुसुचित जाती स्त्री राखीव असून सिंधुबाई रामदास वानखेडे या सरपंच पदी तर वंदनाबाई तानाजी जाधव ह्या उपसरपंच पदी विराजमान असल्या तरी सत्तेची सर्व सुत्रे काँग्रेसचे निलेश जाधव यांच्या हातात आहे. सिंधुबाई या निरक्षक असून त्यांचे पती अल्पशिक्षित आहेत. सत्तेची सुत्रे हातात ठेवण्यासाठी निलेश जाधव यांनी त्यांच्याच पॅनलच्या सुनिताबाई ज्ञानदेव वले या सुशिक्षित महिलेस डावलून निरक्षर महिलेस सरपंच पदी बसविले. सरपंच पदी अल्पशिक्षित व ग्रा.प.कारभाराविषयी अनभिज्ञ असूनही त्यांची ग्रामपंचायत कारभारात लुडबुड सुरुच आहे. व त्यातुनच विरोधकांना त्रास देण्याचे सुत्र आरंभलेले आहे. घरकुल बांधलेल्या जागेची पाहणी करुन न्याय देण्याचे आव्हान त्यांनी निवेदनात केले आहे.
गटविकास अधिकारी घुसर बु. ग्रा.प.तीला भेट देण्यास आले असता घरकुलाची जागा प्रत्यक्ष पाहण्याची त्यांना विनंती केली आहे. ती त्यांनी मान्यसुद्धा केली. परंतु पाहणी न करता ते निघुन गेले. ज्या मार्गाने बिडिओ साहेब गेले त्या रस्त्यापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर घरकुल असून बिडिओ साहेबांनी ते पाहण्याचे टाळले. त्यामुळे दोन अडीच महिन्यापासून घराचे काम दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे बंद आहे.  पाठीमागे देणेकर्‍यांच्या सारखा तकादा सुरु असल्याचे व त्यामुळे त्रास झाल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले.