Breaking News

लि.भो.चांडक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मलकापूरचे क्रीडा प्रकारात घवघवीत यश

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे यांचे विद्यमाने व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा द्वारा आयोजित विभागीय बॅटबॉलमिंटन स्पर्धा दि.28/9/2017 रोजी गौरीशंकर   येथील मैदानावर संपन्न झाल्या   त्यात लि. भो.चांडक कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात कर्णधार प्रतीक्षा साखरे हिच्या उत्कृष्ट खेळीमुळे विजय संपादन करून आपला संघ राज्यस्तरावर खेळण्यास पात्र ठरला तर मुलांच्या संघाला उपविजयी पदावर समाधान मानावे लागले तसेच लि. भो.चांडक विद्यालय मलकापूर शाळेचा 14 वर्षीय मुलीचा संघ ह्या स्पर्धेत उपविजयी  ठरला राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहेत ह्या स्पर्धसाठी श्री निलेश महाजन विजय पळसकर राजेशजी खंगर यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या ट्रायल साठी 14 वर्षीय गटातून मुलातून यश डीखोळकर तर 17 वर्षीय मुलामधून अक्षय महाजन 14 वर्षीय मुलींमधून वैष्णवी ठोसर तर 17 वर्षीय मुलींमधून प्राची डोसे यांचे निवड झालेली आहे तसेच इतर क्रीडाप्रकारात लि.भो.चांडक शाळेने भरीव असे यश संपादन केले आहे  तायक्वांदो  स्पर्धेत रोशन चंदेल ह्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड व तलवारबाजी मध्ये मानसी शेरेकर विभागीय स्पर्धेत निवड खो -खो14 व 17 असे दोन्ही वयोगट मुले जिल्हास्तवर निवड व वैटलिफ्टिंग ह्या क्रीडाप्रकारात अभिषेक संभाजी पाटील ह्याची सांगली येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
शाळेचे व्यवस्थापक मंडळ उपप्राचार्य श्री राजूरकर सर शिक्षकेत्तर कर्मचारी व क्रीडाशिक्षक श्री गणेश तायडे सर सुहास वराडे सर व श्री विक्रांत नवले सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.