Breaking News

नदीजोड प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची सांगता; डिसेंबरमध्ये पैसे मिळण्याचे आश्‍वासन

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - पारोळा तालुक्यातील शिरसमणी,भोंडण व पोपटनगर येथील शेतक-यांच्या शेतजमीनी नदीजोड प्रकल्पात संपादीत करण्यात आल्या आहेत. या प्रक रणी अंतिम निवाडा झाला परंतु शेतक-यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास प्रकल्पग्रस्त शेतकरी बसले. शुक्रवारी दुपारी  खा.ए.टी.नाना पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व पाटबंधारे विभागच्या अधिका-यांनी आंदोलकांशी यशस्वी चर्चा करून उपोषणाची सांगता केली. डिसेंबर महिन्यात  शेतक-यांना रक्कम मिळणार असून दिवाळी अ‍ॅडव्हान्स 35 लाख रुपयांचे 220 शेतक-यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी 11 वाजेच्या सुमारास भेट दिली. याप्रसंगी अ‍ॅड.राजेश झाल्टे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक सतीश काळे, कार्यालयीन अधिक्षक एस.एफ  गावीत व उपोषण कत्र्यांमध्ये चर्चा झाली.आंदोलकांनी आक्रामक होत टोकाची भुमीका घेतली होती.शेतक-यांना देण्यासाठी शासनाकडे पैसे नाही परंतु नविन गाडया खरेदी क रण्यासाठी डिपीडीसीकडे पैसे आहेत. पैसे नसतील तर प्रकल्प बंद करा चारी बुजवा आणि आमच्या जमिनी परत करा अशी भुमिका मांडली.तसेच निर्णय न झाल्यास सायंकाळी  5.30 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस ठाण्यात जावून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाट बंधारे विभागाच्या अधिका-यां विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे स्पष्ट  सांगीतले. यावर खा. पाटील यांनी याप्रकरणी अधिवेशनात बोलणार असल्याचे सांगीतले.