Breaking News

श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात अधिका-यांच्या हस्ते सोलर पॅनलचा शुभारंभ

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर व तालुक्यात पहिल्यांदाच हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात सोलर पॅनल  उभारण्यात आले असून शिक्षण विभाग अधिकार्यांच्या हस्ते सोलर पॅनलचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्याध्यापिका सौ.विद्या मुजुमदार व त्यांचे पती अ‍ॅड. मधुसूदन  मुजुमदार यांनी स्वखर्चातून हे पॅनल उभारले आहे. 
शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, द.शि. विद्यालयाचे उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांच्या  उपस्थितीत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांच्या हस्ते सोलर पॅनलचा शुभारंभ करण्यात आला. दोन किलो वॅटचे हे सोलर पॅनल असून सध्या सर्व  वर्गांना वीजपुरवठा होईल एवढी क्षमता पॅनलची असून भविष्यात ही क्षमता वाढवून संगणक लॅबही सोलरवर चालविण्याचा शाळेचा मानस आहे. तसेच एक हजार विद्यार्थ्यांना पुरेल  एवढ्या क्षमतेचे वॉटर फिल्टर कुलरचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे संगणक लॅबचे आधुनिकीकरण करून  त्याची रंगरंगोटी, 30 संगणक, नवीन सॉफ्टवेअर, प्रोजेक्टर, ई-लर्निंगचे उद्घाटन शापोआ अधिक्षक सुमित्र अहिरे यांच्या हस्ते झाले. माध्यान्ह भोजनाच्या फळभाज्या व इतर साहित्य  ठेवण्यासाठी फ्रिजही घेण्यात आला आहे.
या सर्व सुविधांसाठी मुख्याध्यापिका सौ.विद्या मुजुमदार व त्यांचे पती अ‍ॅड.मधुसूदन मुजुमदार यांनी स्वखर्च केला आहे. त्यांना उपमुख्याध्यापक मनोज माहेश्‍वरी, पर्यवेक्षक प्रमोद  आठवले, अनिल माळी, मयूर शहा, सतीश कवटे, दीपक आमोदकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिकेने स्वखर्चातून शाळेसाठी  उभारलेल्या विविध प्रकल्पांचे मान्यवरांनी कौतुक करून इतरांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असा हा उपक्रम असल्याचे यावेळी नमूद केले. यावेळी गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ संजय  गायकवाड, यशवंत धायगुडे, जितेंद्र पवार, रमेश दांगोडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.