Breaking News

सज्जनगडावरील आंग्लाई मंदिरात चोरीचा प्रयत्न, तटावर देवीच्या साड्या जाळल्या

सातारा, दि. 27, ऑक्टोबर - सज्जनगडावर पहाटे गडावरील ग्रामदेवी असलेली तसेच समर्थ स्थापित आंग्लाईदेवी मंदिरात पहाटे दरवाज्याचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथम दर्शनी कोणता ऐवज चोरी झाल्याची माहिती सङ्कोर आली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मछले करीत आहेत. 
नेहमी प्रमाणे पहाटे पाच वाजता आंग्लाई देवीचे मंदीर उघडण्यात आले. मंदीर उघडुन पुजारी मुख्य मंदिरात गेले.परत सहा वाजता पूजा करायला आल्यावर मंदीर गाभ्या-याचा दरवाजा उघडा दिसला.त्यांनी पाहणी केली असता कुलुप तोडलेले दिसले. ही बाब त्यांनी समर्थ रामदास स्वामी संस्थानमध्ये कळवली. तात्काळ पाहणी केल्यावर मंदिरातील पूजेचे साहित्य विस्कटलेले होते. देवीच्या साड्या नव्हत्या. गाभारा विस्कटला होता मंदीराच्या बाहेरील बाजुस असलेल्या तटावर काही साड्या जाळल्या होत्या. चोरीची घटना समजताच
ग्रामस्थ,भाविकांची गर्दी वाढू लागली.सदर घटनेची पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. दरम्यान, सज्जनगडावर दररोज हजारो भाविक येत असतात.मात्र,त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाय योजना नसते. वाहनतळावरून पेट्रोलचोरी,वाहन पार्किंगवरून वादावादी होत असते. छोट्या चो-या होत असतात. यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.