Breaking News

युवा नेते आशुतोष काळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - सिटीझन्सइंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली यांच्यावतीने उद्योग व सामाजिक क्षेत्रातभरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींना देशाचे दिवंगत राष्ट्रपती  डॉ. ए. पी. जे.अ ब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या क र्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांना नुकताच नवी दिल्ली  येथे प्रदान करण्यात आला. 
येथील इंडिया इंटरनॅसेंटर सेमिनार हॉल येथे देशाचे माजी गृहराज्य मंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल शिवाजीराव पाटील चाकूरकरयांच्या हस्ते मॉरीशसचे भारतीय राजदूत जे गोवर्धन,  माजी राज्यपाल व केंद्रीय मंत्री डॉ. भीष्म नारायण सिंग व नेपाळचे भारतीय राजदूत दिपकुमार उपाध्यय आदी यावेळी उपस्थित होते.
आपल्या देशाची सर्वागीण प्रगती व्हावी. युवकांचा देशाच्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूटनवी दिल्ली हि संस्था काम करते.  यासंस्थेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे देशाचे माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा उद्योग व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या  व्यक्तींना मिळावी यासाठी सिटीझन्स इंटेग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्ली यांचे वतीने डॉ. कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्कार डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जातो.  यावर्षीचा हा पुरस्कार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना उद्योग, सहकार व सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे, शांत व  संयमी स्वभाव असलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कामगिरी करणारे काळे या पुरस्काराचे मानकरी ठरले.