Breaking News

शेंदुर्णीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रम

जळगाव, दि. 17, ऑक्टोबर - शेंदुर्णी येथील गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियांना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास  विभाग यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची सकाळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली. बेटी बचाओ, चा संदेश देणारे घोषवाक्याद्वारे तसेच  पथनाटयाद्वारे मुलींचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, उपप्राचार्य एन.एस. सावळे, प्रा.डॉ.  संजय भोळे, विद्यार्थी विकास अधिकारी (जिल्हा) प्रा.अगर जावळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही. एन. पतंगे, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.डी. गवारे, सहायक क ार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश पाटील सहायक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. योगिता चौधरी, प्रा. सुजाना पाटील, प्रा.पी. जे. सोनवणे सी 2 कार्यक्रम अधिकारी से. योयांच्या  मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.