Breaking News

युवाशक्तीला आदर्श गणेशोत्सव पुरस्कार

जळगाव, दि. 17, ऑक्टोबर - पोलिस दलातर्फे गणेशोत्सव 2017 निमित्त पारितोषिक वितरण कार्यक्रम मंगलम् हॉल, पोलिस मुख्यालय येथे झाला. कार्यक्रमात युवाशक्ती फाऊ ंडेशनला आदर्श गणेशोत्सवाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय क-हाळे, आ.चंदूलाल  पटेल, आ.स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, करीम सालार, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे, सचिन नारळे यांची  उपस्थिती होती.
युवाशक्तीतर्फे स्मार्टफोनचे फायदे व तोटे या विषयावर देखावा आयोजित करण्यात आला होता. गणेशोत्सवादरम्यान अथर्वशिर्ष पठण, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,  तृतीयपंथीयांच्या हस्ते आरती, सर्वधर्म समभाव प्रस्थापित होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.