Breaking News

अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला जिल्हा मुकला

राजीव राजळे आणि कुंडलिकराव जगताप यांना सर्वपक्षांच्यावतीने श्रध्दांजली

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - कै.राजीव राजळे आणि कुंडलीकराव जगताप यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला जिल्हा मुकला असल्याचे अनेक मान्यवरांनी श्रध्दांजली  सभेत बोलताना व्यक्त केले. या दोन्हीही नेत्याच्या निधनाने प्रज्ञावंत आणि अभ्यासू अशा नेत्यांना संपूर्ण नगर जिल्हा मुकला आहे.
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी येथील सहकार सभागृहात सर्वपक्षिय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडाख बोलत होते. यावेळी  पालकमंत्री राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, आ. शिवाजीराव कर्डिले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, महापौर सुरेखा कदम, आ. डॉ. सुधीर तांबे, माजी  आ. शिवाजीराव नागवडे, अनिल राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, प्रदेश युवक काँग्रेसचे  उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, सुजित झावरे, माजी महापौर अभिषेक कळमकर, घनशाम शेलार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, नगरसेवक सुवेंद्र गांधी, अशोक गायकवाड आदी उपस्थित  होते.
गडाख म्हणाले की, राजीव राजळे यांना संगीत, कला, क्रीडा क्षेत्रासह वाचनाची आवड होती. त्यांच्या जाण्याने पाथर्डी तालुक्यासह दक्षिण नगर जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले  आहे. त्यांचे नेतृत्व समाज, पक्ष व पुढार्‍यांना झेपले नाही. यावेळी शालिनीताई विखे, आ. शिवाजीराव कर्डिले, अनिल राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.