Breaking News

47 हजाराचा ऐवज चोरी ; मारहाणीत दोन जखमी

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर चोरट्यांनी चोरीचा डाव साधला असून घोसपुर (ता. नगर), सारसनगर, सावेडी येथे चोरी करून चोरट्यांनी  सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही, रोख रक्कम असा 47 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. यामधील दोन चोर्‍या हा ॅस्पिटल व लॉजमध्ये करण्यात आल्या आहेत. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती की, कुसूम गवरा घोडके (वय 65, रा. घोडकेवाडी, घोसपुरी, ता.नगर) ही महिला घरात असताना रात्री 9.45 वाजता तीन चोरटे घरात  घुसले. चोरट्यांनी कुसूम यांच्या डोक्यास काठीने मारहाण करून त्यांना जखमी केले तसेच त्यांच्या कानातील सोन्याची कर्णफुले व रोख रक्कम असा एकुण 9 हजाराचा ऐवज चोरून  नेला. कुसूम घोडके यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी चोरट्यांविरूध्द भादवि कलम 394,  34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई क्षीरसागर करत आहेत. दुसरी घटना सारसनगर भागात घडली. प्रकाश धनाजी सपकाळ (वय 25 रा. कपिलेश्‍वर,  सारसनगर) यास वसीम (पूर्ण नाव माहित नाही) याने लॉजच्या रूमची चावी मागितली. तेव्हा सपकाळ यांनी रजिस्टरवर नोंद करा असे सांगितले. त्याचा राग येवून वसीम व अन्य  तीन अनोळखी व्यक्तींनी सपकाळ यांना लोखंडी गजाने मारहाण करून लॉजचे नुकसान केले व काऊंटरमधील 23 हजाराची रोख रक्कम चोरून पोबारा केला. याप्रकरणी प्रकाश  सपकाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे.