Breaking News

अजिंठ्याच्या पर्यटकांसाठी खाजगी बसची खास सोय

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - एस.टी. महामंडळाचा संप सुरू राहील्यास अजिंठा लेणीसारखे जागतिक वारसा स्थळ पाहावयास येणार्‍या देशी विदेशी पर्यटकांची गैरसोय होऊ नये  म्हणून जिल्हा प्रशासनाने अजिंठा टि पॉईंट ते अजिंठा लेणी या 4 कि.मी. मार्गावर एस.टी. महामंडळाच्या बसेस ऐवजी करारबध्द असलेल्या 4 बसेसला पर्यटकांची ये-जा क रण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील बसचे भाडे आर.टी.ओ ने निश्‍चित केलेल्या दरानुसार घ्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अजिंठा लेणी  पाहावयास येणार्या पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचे प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे यांनी कळविले आहे.