Breaking News

वांद्रे स्थानक परिसरात सिंलेडरच्या स्फोटामुळे आग

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - वांद्रे स्थानकानजिक असलेल्या झोपडपट्टी भागात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली. यावेळी झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाची क ारवाईही सुरू होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 वॉटर टॅन्कर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लवकरात लवकर विझवली  जावी आणि आगीचे प्रमाण वाढू नये यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
झोपडपट्टीमधील सिलेंडरचे स्फोट होत असल्याने आगीचे प्रमाण वाढत आहे. बघ्यांच्या गर्दीमुळे आग्निशमन दलाच्या जवानांना कामात अडथळा निर्माण होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीक ोनातून येथील परिसर बंद करण्यात आला आहे.वांद्रे स्थानकाच्या तिकीट खिडकीच्या खाली अनेक झोपडया उभारण्यात आल्या आहेत. ते हटवताना एका झोपडीतल्या सिलिंडरचा  स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहेत. या घटनेत जावितहानी झाल्याचे वृत्त नाही.