Breaking News

मुंबईत मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता; पोलिसांनी दिला सर्तकतेचा इशारा

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - बॉटनेटचा वापर करून इंटरनेट सेवा बंद पाडणार्‍या ‘मिराई’ या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यानंतर आता त्याहीपेक्षा मोठा सायबर हल्ला मुंबईत होण्याची  शक्यता आहे. यासाठी राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. 
आता हा हल्ला थेट इंटरनेटवर आधारित उपकरणांवर होणार असून यामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडणार आहे. यामुळे या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा ब्रिजेश सिंग यांनी  दिला आहे.
2016मध्ये मिराई नावाचा सायबर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पडली होती. त्यावेळी हल्लेखोराकडे पाच लाख वापरकर्त्यांचा  तपशील उपलब्ध होता. आता याहीपेक्षा मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे.