Breaking News

पुण्यातील डीएसकेंची ड्रीम सिटी विक्रीला

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णीं यांच्याविरोधात सात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. उद्यापासून  गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार असून पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढण्यात येणार असल्याचं डीएसकेंनी सांगितले  आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डीएसकेंना पुणे पुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात बोलावण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी डीएसकेंना कडक शब्दात समज दिली आणि पैसे  परत न केल्यास अटक करु, असा इशाराही दिला. त्यानंतर उद्यापासून टप्प्याटप्प्याने पैसे परत करण्यास सुरुवात करु, असे आश्‍वासन डीएसकेंनी गुंतवणूकदारांना दिले. त्यासाठी  साडे चार कोटी रुपयांची तजवीज केली आहे.मात्र तुम्ही मला तुरुंगात पाठवले तर तुमचे पैसे का देऊ, असा सवालही डीएसकेंनी गुंतवणूकदारांना केला. ड्रीम सिटी हा डीएसकेंचा  महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. काही दिवसांपूर्वीच डीएसकेंची अशी अवस्था का झाली, याबाबत सविस्तर वृत्त दाखवले होते. होतं. ड्रीम सिटी उभारु, असे त्यावेळी डीएसकेंनी  बोलताना  सांगितले होते. मात्र आता ड्रीम सिटी विक्रीला काढली आहे. त्यासाठी एक अमेरिकन कंपनी पाहणी करण्यासाठीही येणार असल्याचे समजते.