Breaking News

रस्त्यावरील मुलांना कपड्यांसह फराळाचे वाटप

पुणे, दि. 17, ऑक्टोबर -  दिवाळी ही मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. अशा सणासुदीच्या दिवशी दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू आणण्याचा आनंद काही वेगळाच असतो.  पुणे नवरात्र महोत्सव समितीने असेच काही केले आहे. त्यांनी रस्त्यावर राहणार्‍या मुलांना दिवाळीनिमित्त नव्या कपड्यांसह फराळ आणि फटाक्यांचे वाटप केले.
ज्या लोकांना घरदार नाही. अशा वंचित घटकांची दीवाळी ही रस्त्यांवर साजरी होते. अशा लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी त्यांना खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी करता यावी,  यासाठी पुणे नवरात्र महोत्सव समितीने खास उपक्रम राबवला. त्यांना पदपथावरील मुलांसाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान घातले. तसेच त्यांना नवीन कपडे दिली.  शिवाय त्यांना दिवाळीचा फराळ, फटाकेही दिले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून सर्व बागुल कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.