Breaking News

मागासवर्गियांच्या आरक्षणासाठी प्रबोधन सभा

जळगाव, दि. 01, ऑक्टोबर - देशातील बहुसंख्य असणार्‍या मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले नोकरीतील व पदोन्नतीतील आरक्षणाचे  प्रतिगामी व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून संपुष्टात आणर आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी व जन आंदोलन लढा उभारण्यासाठी आरक्षण बचाव कृति समिती  स्थापन करण्यात आली असून या समिती तर्फे दि. 1 आक्टोबर रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रबोधन सभेचे आयोजन सकाळी 11  वाजता करण्यात आले. 
नुकतेच पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याविरूध्द काही कामगार संघटना व राज्य सरकार या विरूध्द अपिलात गेले आहे. आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी व  जिल्ह्यात जन आंदोलन उभारण्यासाठी जिल्ह्यातील 23 खात्यांचे केंद्र व राज्य सरकार,निमशासकीय कार्यालयातील मागासवर्गीय संघटनांनी आरक्षण बचाव समिती  स्थापन केली . दि. 1ऑक्टोबर रोजी होणार्‍या प्रबोधन सभेत आगामी काळातील दिशा व आंदोलनाचा पवित्रा तसेच प्रत्येक जिल्ह्यात करावयाचे आंदोलन याबाबत  मार्गदर्शन करण्यात आलेे. पत्रकार परिषदेस राजेंद्र भालेराव,हरिश्‍चंद्र सोनवणे,योगेश नन्नवरे,जहांगिर खान आदी उपस्थित होते.