Breaking News

मुंबई ते शिर्डी 40 मिनिटात विमान सेवा

शिर्डी, दि. 01, ऑक्टोबर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आले आहे.  राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार्‍या विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून, मुंबई ते शिर्डी हा प्रवास  केवळ 40 मिनिटांत करता येणार आहे.
तसेच शिर्डीहून हैदराबादसाठीही विमानसेवा आजपासूनच सुरू होणार असून संध्याकाळी साडेचार वाजता शिर्डीहून हैदराबादसाठी विमान झेपावणर आहे. त्यामुळे शिर्डी ते मुंबई, शिर्डी ते हैदराबादबरोबरच लवकरच शिर्डीहून दिल्ली आणि भोपाळसह अनेक शहरांपर्यंत विमानसेवा सुरू होतील.