Breaking News

2 ऑक्टोबर रोजी ‘क्लीन कोल्हापूर’ मोहिम !

कोल्हापूर, दि. 01, ऑक्टोबर - प्रतिमा पाटील सोशल वेलफेअर असोसिएशन आणि कोल्हापूरमधील विविध स्वयंसेवी सामाजिक संस्थांतर्फे 2 ऑक्टोबर रोजी  ‘क्लीन कोल्हापूर’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला महापौर हसीना फरास आणि विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांची प्रमुख  उपस्थिती असणार आहे. अंबाबाई मंदिर परिसरातून या मोहिमेला प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रतिमा पाटील यांनी दिली. 
‘क्लीन कोल्हापूर’ या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील मंदिरे आणि मॉल्स परिसरात ही स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील सर्व प्रभागांमध्ये  टप्प्या टप्प्याने ही मोहिम राबवून स्वच्छे विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, त्याचबरोबर स्वच्छतेबाबत  लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ’क्लीन कोल्हापूर’ स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.