Breaking News

आरोपी व्यापार्‍यांचे परवाने रद्द करा! : स्वाभिमानीचे हंगामा आंदोलन

बुलडाणा, दि. 15, ऑक्टोबर - आज 14 ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरवंट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य बाजार समोर शेकडो शेतकर्‍यांच्या  उपस्थितीत हंगामा आंदोलन करण्यात आले. 
संग्रामपूर तूर घोटाळा प्रकरणी दि.20/9/2017 रोजी खरेदी विक्रीच्या बारा संचालकासह व्यवस्थापक व काही व्यापार्‍यांवर एकूण 20 लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले  होते. यामध्ये काही बाजार समितीचे परवानेधारक व्यापार्‍यांचा सुद्धा समावेश होता या व्यापार्‍यांनी गुन्हे दाखल झााल्यानंतर द्वेषापायी काही दिवस वरवंट बकाल येथील धान्य बाजारात  खरेदी सुद्धा बंद करुन शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. याचीच दखल घेत स्वाभिमानी  शेतकरी संघटनेने दि.10 ऑक्टोबर रोजी आरोपी व्यापार्‍यांच्या परवाने  रद्द करा अन्यथा वरवंट येथे आंदोलन करण्यात येईल अशा इशार्‍याचे निवेदन संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते. परंतु आरोपी व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्याचे अ धिकारी बाजार समितीला असताना सुद्धा त्यावर बाजार समितीने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे अखेर दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वरवंट बकाल येथील कृ उबा समिती धान्य बाजार समोर स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात  या आंदोलनाला सुरुवात झाली. त्या आंदोलनामध्ये तुर अन्यायग्रस्त शेतकरी  बहुसंख्येने असल्याने आरोपी व्यापार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. आरोपी व्यापार्‍यांचे परवाने तात्काळ रद्द करा, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो  शेतकरी एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी सर्व धान्य बाजार दनानुन सोडला. अखेर या आंदोलनाची दखल घेत कृउबा समितीचे सभापती श्रीकृष्ण  तराळे व संदिप माठे यांनी  आंदोलनकर्त्यांना 21 ऑक्टोबर पर्यंत आरोपी  व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्यात येतील असे लेखी स्वरुपाचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले असून या आंदोलनाची सांगता क रण्यात आली. हे आंदोलन शेतकर्‍यांचे शोषण करणार्‍या आरोपी व्यापार्‍यांचे विरोधात असल्याकारणाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समिती संचालक शांताराम दाणे व  संग्रामपूर खरेदी विक्री संघाचे संचालक मोहन रामराव पाटील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी या आंदोलनामध्ये युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोल्हर, संतोष गाळकर, रोशन देशमुख, अनंता मानकर, रामदास भोपळे, विलासभाऊ तराळे,  विठ्ठल गोमतारे, गणेश मानखैर, श्रीकांत भोबळे, गणेश मालोकार, निलेश हागे, गणेश भालतडकसह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
या आंदोलनामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार इंगळे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर पारवे तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.