Breaking News

वीज पुरवठा सुरुळीत करण्याची मागणी

बुलडाणा, दि. 15, ऑक्टोबर - परिसरामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकर्‍यांचे  अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा सुरुळीत  करण्यात यावा व कायम स्वरुपी अभियंता देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी एका निवेदनाद्वारे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. 
धामणगाव बढे परिसरामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांचे  झालेले नुकसान व आता विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. या परिसरामध्ये विद्युत कंपनीचे अपुरा कर्मचारीवर्ग व अभियंता नसल्यामुळे अनेक क ामे रखडलेली आहे.
शॉर्टसर्किटमुळे डी.पी. जळाली तर 8 ते 15 दिवस सदर डि.पी. बदलुन मिळत नाही. या त्रासाला कंटाळुन शेतकर्‍यांनी विद्युत कंपनीच्या अभियंताना एक निवेदन देवुन सदर मागण्या  आठ दिवसाच्या आत पुर्ण न झाल्यास 23 ऑक्टोंबर रोजी आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिपक दांडगे, रविशंकर जाधव, अशोक  हिवाळे, गजानन उबाळे, भगवान दराखे, गजानन घोंगडे, दुर्गादास बढे, शालीग्राम घोंगडे यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी दिला आहे.