Breaking News

युवकांनी जास्तीत जास्त संख्येने रयत क्रांती संघटनेमध्ये सामील व्हावे!

बुलडाणा, दि. 15, ऑक्टोबर - राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जानेफळ येथे होणार्‍या राज्य मेळाव्याच्या  अनुशंगाने भेट दिली. या भेटिदरम्यान त्यांच्या समवेत जितु अडेलकर, विनायक सरनाईक, संतोष राजपूत, प्रशांत ढोरे, अनिलसिंग चव्हाण, शाम देवकर, बाळासाहेब गवई, व इतर  संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
अनिल जैन व सिद्धार्थ सपकाळ या सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी मा.सागर खोत यांच्या छोट्याखाणी सत्काराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सागरभाऊंनी युवकांना जास्तीत  जास्त संख्येने संघटनेत सहभागी होण्याचे अवाहन केले तसेच संघटनेच्या ध्येयधोरणावर व भविष्यातील वाटचाली संदर्भात विस्तृत प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी शेकडो युवक  उपस्थित होते. तसेच सागर यांनी यावेळी बारोमासकार सदानंदजी देशमुख यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन आवर्जुन भेट घेतली. यावेळी देशमुख सरांनी खोतांना तहान कादंबरी भेट  म्हणून दिली. या छोटेखानी कार्यक्रमाचे संचलन शिंदे सर यांनी केले तर याप्रसंगी गणेशजी सवडतकर डॉ.श्रीकृष्णजी काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.