Breaking News

आनंद विश्‍व गुरुकुल महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

ठाणे, दि. 16, ऑक्टोबर - शारदा एजुकेशन सोसायटी संचलित आनंद विश्‍व गुरुकुल महाविद्यालयात शालेय व आतंरशालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी  मान्यवर परिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. आतंरमहाविद्यालय व आतंरशालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्या व महाविद्यालयाच्या  प्रभारी प्रार्चाया हर्षला लिखीते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, प्राथामिकविभागाच्या मुख्याध्यापिका वैदेही कोळबकर, लॉ कॉलेज प्रभारी प्राचार्य सुयश प्रधान,  उपमुख्याध्यापिका दिपीका तलाठी, परिवेक्षक सचिन आंबेगावकरआदी मान्यवर उपस्थित होते. सर्व परिक्षकांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात 10 शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात आतंरशालेय आतंरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे 12 प्रकल्प तर शालेय व आतंरशालेयविद्यार्थ्यांचे 67 प्रकल्प होते. सदर  विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचा पारितोषिक समारंभ झाला. त्यात शालेय व आतंरशालेय गटामध्ये पारितोषिके देण्यात आली. आतंरशालेय स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी गटात ज्ञानसाधना  विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक मिळविला तर इयत्ता 8 वी ते 10 वी गटात ज्ञानसाधनाविद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कनिष्ठ  महाविद्यालयीन गटात आनंद विश्‍व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शालेय गटातही चारही गटांत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
या विज्ञान प्रदर्शनासाठी परिक्षक म्हणून प्रा. नाजर मॅडम, नंदकिशोर भाटे, प्रा. प्रांजली मॅडम, डॉ. माणिक सांबूज, मधुरेश सिंग यांनी सर्व प्रकल्पांची पाहणी केली तसेच पारितोषिक  वितरण समांरभाच्या वेळी विद्यार्थ्यांनी बनविलेलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.