Breaking News

पाण्याच्या नियोजनामुळे राज्यात इस्त्राईलप्रमाणे संपन्नता

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - देशातील रखडलेले 350 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश  करण्यात आला असून, लवकरच 50 प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. राज्याच्या सिंचन विकासासाठी केंद्र शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ग्रामीण  भागाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. इस्त्राईल देशात पाण्याच्या नियोजनामुळे शेतीतून संपन्नता आली आहे. आपल्याकडेही याच पद्धतीने पाणी नियोजन केले तर  नक्कीच संपन्नता येईल, असा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विश्‍वास व्यक्त केला.
तालुक्यातील युटेक साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू,  जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. प्रवीण दरेकर, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आ.  प्रवीण दरेकर, आ. स्नेहलता कोल्ह, मंत्री बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ व  3500 टी. सी. डी साखर कारखाना व   14.9 मेगावॅट सहविजनिमिॅती प्रकल्पाचे यावेळी उदघाटन झाले. गडकरी म्हणाले, रविंद्र बिरोले या सामान्य तरुणाने माळरानावर सुरु केलेल्या या उद्योगाच्या माध्यमातून हजारो  तरुणांना रोजगार मिळेल आणि या भागात संपन्नता येईल. ऊस लागवडीसोबतच बांबू लागवड करा, यातून पर्यांवरणाच्या संवर्धनासोबतच वीजनिर्मिती करणे शक्य होईल. ऊस  लागवड करतांना ठिबकचा वापर करा. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात ठिबक सिंचनाला प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे.
साखर उद्योगावर आधारीत उद्योगांना बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच सामान्य कुटुंबातील तरुणांने मोठ्या संघर्षातून उभा केलेला उद्योग या भागासाठी वरदान  ठरेल.
राज्यात यंदा सर्वदूर पाऊस चांगला झाला ही कारखाना व ऊस उत्पादकांसाठी जमेची बाजू आहे. पुढील वर्षी बर्‍यापैकी पाऊस झाला तरी ऊसाची स्थिती चांगली राहील. साखर  निर्यातीवरील सबसिडी कारखान्यांना लवकर मिळाली तर तोट्यातील कारखान्यांना तेवढेच जीवदान व प्रोत्साहन मिळेल. यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत. क ार्यक्रमाचे प्रास्तविक युटेक शुगरचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी केले. संचालिका अश्‍विनी बिरोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.