Breaking News

श्रीरामपुरात ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना कोंडले

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळून थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणने कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामीण भागातील रोहित्र बंद करून शेतक र्‍यांचा विजपुरवठा खंडीत केल्याने संतप्त झालेल्याा शेतकर्‍यांनी आ.भाऊसाहेब कांबळे ,पंचायत समीतीचे सभापती दिपक पठारे ,नगराध्यक्ष अनुराधा आदिक,सिध्दार्थ मुरकुटे यांच्या  नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकार्‍यांना आज कोंडून घेतले.सकाळी 11 वाजता सूरू झालेले ठिय्या आंदोलन दुपारी दोन वाजेपर्यत सूंरू होते.जोपर्यत वीज जोडून दिली जात नाही  तोपर्यत मी पाणीही पिणार नाही असा इशारा दुपारी आ.कांबळे यांनी दिला होता .आमदारकीच्या काळात आ.कांबळे प्रथमच आक्रमक झाले होते ,यावेळी पोलिसांचा मोठा बदोबस्त  लावण्यात आला होता.
 याबाबत आधिक माहिती अशी की, श्रीरामपूर व राहूरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेतीचे वीज कनेक्शन थकबाकीमुळे महावितरणने खंडीत केले आहे,त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील  उभी असलेली पिके धोक्यात आली आहेत.तसेच रब्बी हंगामाची लागवडीत मोठी अडचण निर्माण झाली आहे, महावितरणने कोणतीही पुर्वसूचना न देता शेतकर्‍यांची वीज तोडणीचा  निर्णय घेतला असून थकबाकीदार शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा त्वरीत जोडून देण्यात यावा, तसेच शेतकर्‍यांना बिल भरण्यासाठी सवलतीचे टप्पे करण्यात यावेत, जेणेकरून रब्बी  हंगामाचे नियोजन कोलमडणार नाही.असे मुद्दे असलेले निवेदन यावेळी शेतकर्‍यांच्या वतीने महावितरणचे अधिकारी शरद बंड यांना देण्यात आले.मात्र त्यांनी असर्मथता दर्शविल्याने  आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केला व जोपर्यत विजपूरवठा जोडला जात नाही तोपर्यत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला  .वरीष्ठ अधिकार्‍यांशी बोलून उद्यापर्यत शेतकर्‍यांची वीज जोडून देवू असे आश्‍वासन यावेळी महावितरण कडून देण्यात आल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या दरम्यान आंदोलन तात्पुरते मागे  घेण्यात आले .उद्यापर्यत शेतकर्‍यांची वीज जोडून दिल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येईल असा इशारा आ.भाऊसाहेब कांबळे, पंचायत स मितीचे दिपक पठारे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह शेतकरी, आंदोलक व शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.