Breaking News

सत्ता, संपत्ती अडचणीत येते तेव्हाच धर्म ‘धोक्यात’ येतात : प्रा. पुनियानी

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - भारत हा सर्व जाती धर्माच्या नैतिक मूल्यांवर उभा आहे, जात जमातीच्या परंपरा व संस्कृतीची जाणीव इथल्या राजकीय पक्षांना  आहे म्हणून  जेव्हा जेव्हा सत्ता व संपत्ती अडचणीत येते तेव्हा धर्माचे ठेकेदार ’हिंदूना खतरा आहे’,’ इस्लाम खतरेमे है’ अशी ओरड करतात आणि रोजी,रोटी,च्या प्रश्‍नावरून लोकांचे लक्ष मंदिर-  मस्जिदवर वळवले जाते असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी केले.
रहेमत सुलतान फाउंडेशन व समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.राष्ट्रीय एकात्मता व अल्पसंख्याकासमोरील आवाहने या विषयावर त्यांनी  विचार स्पष्ट केले.यावेळी रहेमत सुलतान फाउंडेशनचे संस्थापक युनिसभाई तांबटकर, प्राचार्य शिवाजी देवढे, आसिफखान दुलेखान , संध्या मेढे,अर्षद शेख, नाना कदम,गफ्फार  शेख, प्रा बापू चंदनशिवे बहिरनाथ वाकळे, निशिगंधा देवकर, राजुशेख, रविंद डिकरुज, डॉ.परवेझ, सय्यद अफजल, अभिजित वाघ, शौकतसर, आर्किटेक्ट फिरोज शेख आदि  मान्यवर उपस्थित होते
 पुढे  बोलताना पुनियानी म्हणाले इंग्रजानी देशाची लूट केली, इथली संपत्ती घेऊन जाण्यासाठी रेल्वे  आणली, आंदोलन करणार्यांसाठी जेल बांधले. धर्माच्या नावाने दंगल तेच क रतात ज्यांना त्यातून फायदा असतो आणि कोणतीही दंगल पूर्वनियोजितच असते. दंगल भडकवण्यासाठी आधी धर्माच्या जातीच्या नावाने द्वेष भडकवले जातात सत्ता व संपत्तीसाठी  द्वेष पसरवण्याच काम केले जाते.  प्रत्येक धर्मातील नैतिकमुल्याचे  आदर करून इथल्या नागरिकांनी जगले पाहिजे. संविधान आपल्या मनामनात रुजले पाहिजे कारण आपल्याला   इज्जतदार समाज उभा करायचा आहे. द्वेषाने माणुसकी संपून जाते.इथल्या राजसत्ता रोजी, रोटी, रोजगार यावर बोलत नाही मात्र काय खावं? काय खाऊ नये? कोणते कपडे  घालावेत आदी बाबत सत्तेची पिलावळ बोलते  मात्र संविधानवर  बोलत नाहीत. धर्माच्या नावाने राजकारणाला प्रोत्साहन दिले जात आहे मात्र धर्मातल्या नैतिक मुल्याना प्रोत्साहन  दिले जात नाही हे लक्षात ठेवून आपण सजग राहिलो पाहजे व त्यासाठी प्रबोधन केले पाहिजे  असे परखड मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. विठ्ठल बुलबुले यांनी तर परिचय मुनज्जर शेख यांनी करून दिला.  सूत्र संचालन शिवानी शिंगवी यांनी केले.