Breaking News

आ. योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी टाकला कचरा

पुणे, दि. 01, ऑक्टोबर - रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोकांनी तीव्र निषेध व्यक्त  केला.रामटेकडी येथे होत असलेल्या कचरा प्रकल्पोध करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता ससाणेनगर रेल्वेगेट येथे रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव समितीसह सर्व  पक्षीयांकडून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक योगेश  ससाणे, शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह भाजप वगळता सर्व पक्षीय स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले आहे.  हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि  नागरिकांनी कचरा प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. येथील स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रामटेकडी येथे बायोएनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड हा कचरा  प्रकल्प उभारण्यासाठी सत्ताधारी भाजप ठाम आहे. भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षीयांचा या कचरा प्रकल्पाला विरोध आहे. गेले अनेक दिवस येथील नागरिक या प्रकल्पास  विरोध करीत आहेत.या प्रकल्पाविरोधात याआधीही अनेक आंदोलने करण्यात आली आहेत.