Breaking News

वाचन संस्कृती विकासासाठी 20 शाळांना पुस्तकांची भेट

सोलापूर, दि. 01, ऑक्टोबर - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार वाचन संस्कृती विकास अभियान राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना  विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळावीत यासाठी सर फाउंडेशन युनिक फीचरच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद च्या 20 शाळांमधील ग्रंथालयांना पुस्तक  संच भेट दिली आहेत. या पुस्तकाचे विरतण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या हस्तेे करण्यात आले. जिल्हा परिषद  शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये वाचन विषयक आवड निर्माण व्हावी. यासाठी वाचन संस्कृती विकास अभियान’ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या  संकल्पनेनुसार राबविले जात आहे. सर संस्था युनिक फाउंडेशन या संस्थेच्या वतीने 20 शाळांना एकूण रुपये पन्नास हजार किमतीची ग्रंथालय पुस्तके वितरीत  केलीत. प्रत्येक शाळेस 13 पुस्तकांचा संच याप्रमाणे 2500 रुपयांची पुस्तके दिली आहेत. यावेळी बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे, हेमा शिंदे, राजकीरण चव्हाण,  मोतीलाल जाधव, रवी चव्हाण, नवनाथ शिंदे, प्रशांत वाघमारे,परवेज शेख, किशोर तोडकर, शरद माने, भावसिंग पवार, अनुराधा काजळे आदी उपस्थित होते.  पुस्तकांचे वाटप झालेल्या शाळा दक्षिण सोलापूर-तीर्थ, कुसूर, चिंचपूर, वळसंग, अकोले म, मोहोळ-इंगोले वस्ती, आष्टे, सय्यद वरवडे, माढा -तुळशी, होळे,  मोडनिंब, अक्कलकोट- सातन दुधनी, ब्यागेहळी, कोन्हाळी,सांगवी बु, मंगळवेढा-मरवड़े, माळशिरस- वाघोली, यशवंत नगर, पंढरपूर- आढीव, उत्तर सोलापूर -  मार्कंडेय नगर आदी शाळांचा समावेश आहे.