Breaking News

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तीस टन गोमांस जप्त

पुणे, दि. 27, ऑक्टोबर -  पुण्यातील हडपसर परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी परदेशात निर्यातीसाठी जाणारे तीस टन गोमांस जप्त केले.या प्रकरणी कंटेनरचालक  संतोष बिरा वर्मा रा. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत गोरक्षक सनी झिंकू वर्मा (23, रा. विमानगर) यांनी फिर्याद दिली आहे.एका कंटेनरमधून हे गोमांस  विजापूरहून मुंबई येथील सानपाडा येथे नेले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कंटेनर ताब्यात घेतला आणि पाहणी केली असता कंटेनरमध्ये छोट्या छोट्या बा ॅक्समध्ये गोमांस भरून ठेवले होते. दरम्यान ताब्यात घेतलेले मांस नक्की कोणत्या प्राण्याचे आहे, याची खात्री करण्यासाठी ते तपासणीला पाठविले आहे.