Breaking News

मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी मनपाकडून 94 जणांना जप्तीच्या नोटीसा

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - मागील काही काळापासून सातत्याने आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेची सध्याची स्थिती अधिकच नजुक झाली असल्याने  अखेरीस अहमदनगर महापालिका प्रशासनाने शहरामध्ये मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कठोर कारवाईचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.मनपा ला आ र्थिक दृष्टी ने भक्कम करण्याच्या उद्देशाने प्रशासना ने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याकडे अधिक लक्ष देऊन बड्या थकबाकीदारांची यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द  केली आहे.तसेच महापालिकेने मालमत्ता कराची मोठी थकबाकी असणार्या 94 जणांना जप्तीच्या नोटीसा बजावल्याने शहरातील मालमत्ताधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अहमदनगर शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेच्या मालमत्ताकराच्या थकबाकीची रक्कम तब्बल 186 कोटी इतकी झाली आहे.त्यातच काही दिवसांपूर्वी भविष्यनिर्वाह निधीच्या  विषयावरून मनपाचे एक महत्वाचे बँक खाते सील करण्यात आले आहे.त्यामुळे मनपातील आर्थिक संकट खूपच गंभीर बनले आहे.
तिजोरी रिकामी असल्याने शहरातील बहुतांश सर्व विकास कामे सध्या बंद झाली आहेत.तसेच मनपा कर्मचार्यांचे वेतन,निवृत्तीवेतन धारकांचे पेन्शनसहीत अनेक ठेकेदारांची मोठी देणी  मनपाले देणे बाकी आहे.त्यातच काही दिवसांपूर्वी महावितरण वीज कंपनीने महापालिकेला स्ट्रीट लाईट चा वीज पुरवठा तोडण्याचा व पाटबंधारे विभागाने थकित बिलासाठी मुळा  धरणातून केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेचे आर्थिक नियोजन सध्या पूर्णपणे ढासळले आहे.अशा कठीण स्थिती मध्ये मालमत्ता कराची  प्रभावीपणे वसुली करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय प्रशासनासमोर शिल्लक राहिलेला नाही.या पाश्वभूमीवर मनपा आयुक्त घनश्याम मंगळे,अतिरिक्त आयुक्त विलास  वालगुडे,उपायुक्त राजेंद्र चव्हाण आदि अधिकार्यांनी मालमत्ता कराच्या वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार शहरातील महापालिकेच्या चारही प्रभाग  समिती कार्यालयांच्या क्षेत्रातील सर्वाधिक कराची बाकी असणार्या 100 थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.या यादीत सरकारी, निमसरकारी कार्यालये,मंगल कार्यालये, शाळा,महाविद्यालये,जिलाधिकारी,महसूल कार्यालय,तहसील कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग,टेलिफोन,काही प्रसिध्द हॉटेल्स,अनेक  व्यापारी संस्था,बांधकाम व्यवसायिक,काही राजकीय पदाधिकारी यांची नावे आहेत.मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी मनपा प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने  शहरात मोठी खळबळ उडाली आहे.