Breaking News

महालक्ष्मी एक्स्प्रेसवर जेजुरी-राजेवाडीजवळ दरोडा; प्रवाशांकडून दागिने, पैसे, मोबाईल लुटले

पुणे, दि. 27, ऑक्टोबर - राजेवाडी स्टेशनदरम्यान दरोडेखोरांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा टाकत प्रवाशांकडून सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाइल लुटण्यात आले. काल  (बुधवार) मध्य रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेली माहिती अशी की, महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री मुंबईहून क ोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. एक्स्प्रेस दीड ते पावणे दोनच्या सुमारास जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. दरोडेखोरांच्या पाच ते सहा टोळ्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करुन  गाडी थांबवली. दरोडेखोर डब्यांमध्ये घुसले. त्यांनी 10 ते 15 मिनिटांत प्रवाशांकडून मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. या प्रकरणी सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर रेल्वे पो लिसांत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.