वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्रीतून होणार नऊ एमएम गोळीचे उत्पादन - राजीव गुप्ता
जळगाव, दि. 15, ऑक्टोबर - भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीत डिसेंबरअखेर नऊ एमएम गोळीचे उत्पादन होणार असल्याची माहिती अपर महाप्रबंधक राजीव गुप्ता यांनी आज दिली.
आज ऑर्डनन्स फॅक्ट्रीचा स्थापना दिवस असल्याने 14 ते 16 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगत पोलीस, सीआरपीएफ व आसाम रायफल्समध्ये नऊ एमएम गोळीची मागणी वाढल्याने वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत त्याबाबत उत्पादन करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयासह कलकत्त केंद्रीय ऑर्डनन्स बोर्डाने मान्यता दिल्याचेही राजीव गुप्ता यांनी सांगितले. याप्रसंगी महाप्रबंधक एस.चॅटर्जी, कर्नल निंबाळकर, प्रशासन अधिकारी शरद राव आदी उपस्थित होते.