नगर शहरात अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्याचे नियोजन पूर्ण
अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - मुंबई उच्च न्यायालयाच्या आार अहमदनगर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी व अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी सध्या महापालिके कडून केले जाणारे नियोजन जवळपास पूर्ण झाले असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात शहरात अडथळा ठरणारी 68 धार्मिक स्थळे हटविली जाणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार चार ही प्रभाग कार्यालयांच्या परिसरात एकूण 104 धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहे.त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चारही प्रभागांमध्ये मिळून एकूण 68 धार्मिक स्थळे हटविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वास्तविक ही कारवाई दिवाळीपूर्वी केली जावी,असे नियोजन केले जात होते.मात्र आता दिवाळी अगदी तोंडावरच आलेली असल्याने बहुदा दिवाळी झाल्यानंतर लगेचच कारवाई सुरू केली जाईल,अशी शक्यता दिसत आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सर्व धार्मिक स्थळे 17 नोव्हेंबर पूर्वीच हटवावी लागणार आहेत.मनपाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात 68 धार्मिक स्थळे 1960 नंतरची आहेत.1960 पूर्वी बांधण्यात आलेली 31 धार्मिक स्थळे दुसर्या टप्प्यात व तिसर्या टप्प्यात 5 धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात चार प्रभाग कार्यालये आहेत.अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकारी यांच्यावर टाकण्यात येणार आहे.त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यातील धार्मिक स्थळांची प्रभागनिहाय यादी तयार करू न प्रभाग अधिकार्याकडे दिली जाणार आहे.दिवाळी व अन्य सुट्ट्यांमुळे कारवाईसाठी खूपच कमी कालावधी शिल्लक राहिलेला असल्याने मनपा प्रशासनाने अतिशय कसोशिने क ारवाईचे नियोजन सुरू केले आहे.या पाश्वभूमीवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.दिवाळी नंतर कारवाई केली जाईल,असे बोलले जात असले तरी कारवाईसाठी शिल्लक राहिलेला कमी कालावधी लक्षात घेता ही कारवाई येत्या 1-2 दिवसांमध्ये देखील केली जाऊ शकते.