Breaking News

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 1 नोव्हेंबरपासून 16 वाढीव फे-या

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 1 नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत 16 वाढीव फेर्‍या सुरू होणार आहे. या सर्व लोक ल ठाण्यापुढील असल्यामुऴे ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात पश्‍चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर  जादा फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची एक संयुक्त बैठक  झाली. त्या बैठकीत या वाढीव फेर्‍या मंजूर झाल्याची माहिती, महाव्यवस्थापकांनी दिली.
दादर-बदलापूर एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-टिटवाळा एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-डोंबिवली तीन जाणार्‍या तीन येणार्‍या फे र्‍या, कुर्ला-कल्याण तीन-तीन येणार्‍या फेर्‍या अशा 16 वाढीव फेर्‍या असून यात महिलांसाठी तीन अतिरिक्त डबे राखीव असतील.