Breaking News

पर्यन प्रकल्प उभारण्याचा निर्णय - महापौर कदम

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच त्या माध्यमधून  शहराच्या विकासाला गती मिळावी त्याचप्रमाणे  रोजगाराच्या संधी उपलब्ध  व्हाव्यात, या उद्देशातून मनपाच्या पिंपळगाव माळवी येथील जागेवर मोठा पर्यटन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍यां कंपन्यांक डून प्रकल्पाचे प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याचे महिाती आज महापौर सुरेखा कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
पुढे बोलताना महापौर सुरेखा कदम महापौर म्हणाल्या की, महापौर पदावर  बसल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पिंपळगाव  माळवी  येथील जागेला मनपाचे नाव लावण्याचा रखडलेला प्रश्‍न  मार्गी लावला. त्यानंतर 4.50 लाख रुपये भरून  त्याची  मोजणीही सुरू करण्यात आली आहे. या जागेवर पर्यटनाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. शहरातील  पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या प्रकल्पाचा फायदाच होणार आहे. शिर्डी-शिंगणापूरला येणारे भाविक या प्रकल्पामुळे नगरकडे वळतील याचा उपयोग होईल. यामधूनच  युवकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. एस्सल वर्ल्ड, रामोजी फिल्मसिटी व राज्यातील चित्रपटनगरीच्या संस्थांशी याबाबत चर्चा सुरु असून ती लवकरच पुर्ण होईल असा  विश्‍वाही त्यांनी व्यक्त केला आहे.  मनपाकडून याबाबत निविदा प्रसिध्द होऊन प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेलाही आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत  निर्माण होईल, असा विश्‍वास महापौर कदम यांनी व्यक्त केला. विविध माहितीसाठी माहितीपुस्तीका तयार केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले आहे.