Breaking News

धार्मिक भावना दुखावणार्‍या पोस्टबद्दल अटक

औरंगाबाद, दि. 18, ऑक्टोबर - एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हाट्सअप टाकणार्‍या तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. त्यापैकी दोघांना अटकही करण्यात आली आहे. वैजापूर येथील सम्राट संजयसिंह राजपूत, संतोष बबन गायकवाड व धनंजय शेटे यांनी सोशल मिडियावर धार्मिक भावना  दुखावणारा मजकूर टाकला असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करीत सम्राट व संतोष गायकवाड या  दोघांना अटक केली.