Breaking News

ऐन दिवाळीत पंधरा गरीब कुुटुंबे थेट रस्त्यावर

बीड, दि. 18, ऑक्टोबर - चुकीच्या सर्व्हे नंबरचा आधार घेवून नगर पालीकेने कोर्टाची दिशाभूल केली. आमची घरे पाडून नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांनी आम्हाला चांगलीच दिवाळी  भेट दिल्याची संतप्त प्रतिक्रीया उद्धवस्त कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आज काही समाज सेवकासह पत्रकारांच्या उपस्थितीत उद्धवस्त झालेल्या कुटुंबियांनी मीना फंक्शन  हॉल याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते सय्यद मोईनोद्दीन मास्टर, ऍड.शेख शफिक, सय्यद खाँजा, संपादक राजेंद्र होळकर,  नगरसेवक हाश्मी, इमरान इनामदार, खबरूल इमान खान यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली. ज्या 15 कुटुंबियांच्या घरावर जेसीबी चालवण्यात  आला. ही सगळी कुटुंबे आजही रस्त्यावर आहेत. रजिस्ट्री आहे, ते नळपट्टी, घरपट्टी नियमित भरत होते. त्यांचे पीआर कार्ड आहे. असे असतांना नगर पालिकेने त्यांच्या घरावर  जेसीबी चालवला. चुकीच्या सर्व्हे नंबरच्या आधारे घरे पाडण्यात आल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. नगर पालिकेने आम्हाला मुदत दिली नाही. त्याचबरोबर आमच्या कु टुंबाचा विचार केला नाही. इतर ठिकाणी जागा देण्याचे आश्‍वासनही नगर पालीकेने दिले नाही अशी संतप्त प्रतिक्रीया पुष्पा काशिद आणि कल्पना सोनवणे यांनी व्यक्त केल्या.