Breaking News

लायन्सचा क्लबचा पणत्या प्रज्वलीत करुन फटाकेमुक्तीचा संकल्प

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दिव्यांनी उजळलेला परिसर, संगीताच्या तालावर आनंद लुटत बडीसाजन सांस्कृतिक भवन येथे शहरातील वंचित  घटकातील मुलांनी दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या दीपोत्सवाचे
वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सालाबादप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क ार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एस.एस. दीपक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे उपप्रांतपाल रमेश शहा, झोन चेअरमन किरण भंडारी, उद्योजक शरद  मुनोत, अध्यक्ष जस्मितसिंग वधवा, सचिव आनंद बोरा, खजिनदार डॉ मानसी असनाणी, कमलेश भंडारी, मनीष सोमाणी, भावना छाजेड, नितीन शाह, ज्योती दिपक, हरजितसिंग  वधवा, महेश देशमुख, सुधीर लांडगे, अमित लोढा, महेश चांडक, अरुण झंवर, मोहन लुल्ला, देवेंद्रसिंग वधवा आदिंसह क्लबचे सदस्य व सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर  उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष जस्मितसिंग वधवा यांनी क्लबच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत कमलेश भंडारी यांनी केले.