Breaking News

‘चाईल्ड करिअर’मध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आकाशकंदील व पणत्या बनवण्याची कार्यशाळा उत्साहात  पार पडली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी कार्यानुभव अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्णकर्कश फटाके व यामुळे होणारे  ध्वनीप्रदूषण असेच धुरामुळे होणारे वायुप्रदूषण यावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन शाळेचे संस्थापक सागर बनसोडे यांनी केले. यावेळी सर्वप्रथम शिक्षकांनी मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून विविध आकारातील पणत्या बनवल्या. तसेच टाकाऊ कागदापासून तसेच रंगीत घोटीव कागद, पुठ्ठे, कार्डशीट पेपर यासारख्या अगदी कमी खर्चाच्या  साहित्यात आकाश कंदील बनवले.
या  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संदिप खाटिक, शाहरुख सय्यद, लक्ष्मन मुंगसे, कैलास तांबे, शुभांगी काळे, कविता लेंभे, मीनाक्षी मुंगसे, आरती जैन, छाया सातपुते, अंकि ता सातपुते यांनी परिश्रम घेतले.