Breaking News

शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे बळीराजा महोत्सव चे आयोजन

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - येथील शिवस्फूर्ती प्रतिष्ठानने शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी बळीराजा महोत्सव...प्रबोधन दिवाळी पहाट चे आयोजन केले आहे .बालगंधर्व रंगमंदिरात  पहाटे 5.45 वा. हा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमाची सुरुवात सम्राट बळीराजाच्या पूजनाने होणार आहे, अ‍ॅड. शैलजा मोळक संपादित ‘शिवस्पर्श या दिवाळी विशेषांकाचे प्रक ाशन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य व पी. ए. इनामदार यांच्या हस्ते आणि पुणे पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानने  ‘बळीराजा महोत्सव’ चार वर्षांपूर्वी सुरु केला . त्याला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बलिप्रतिपदेदिवशी बळीराजाची म्हणजेच आपल्या शेतकरी राजाची पूजा करून हा  दिवस साजरा करावा असा प्रतिष्ठानचा उद्देश आहे.
’इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ हा जागर गेल्या 4 वर्षांपासून पुण्यात बळीराजा महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाट, बळीपूजन व शिवस्पर्श दिवाळी अंक प्रकाशनानिमित्त होत आहे.  ‘बळीराजा’ म्हणजे आपला जनसामान्यांचा व शेतकर्‍यांचा राजा व त्याचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या महोत्सवात शाहीर संभाजी भगत यांचा ’विद्रोही शाहीरी  जलसा’, भगवान गावंडे यांचा ’गाणी क्रांतीची’, अनिरुद्ध वनकर यांचा’शिवराय ते भिमराय’ व सप्तखंजीरी वादक सत्यपाल महाराज यांचा ’सत्यवाणी’ अशा यशस्वी कार्यक्रमानंतर  यंदा सलग पाचव्या वर्षी अकलूजचे सुप्रसिध्द शाहीर राजेंद्र कांबळे यांचा ‘विद्रोही जागर’ हा कार्यक्रम होणार आहे. यात पुरोगामी विचारसरणी, बळीराजा, शिवराय - फुले - शाहू -  आंबेडकर, ग्रामीण संस्कृतीची महती सांगणारी गीते सादर होणार आहेत. बळीराजाच्या मूर्तीभोवती फळे, भाजीपाला, कडधान्य, धान्याची सजावट करून पूजन केले जाते. आपला  अन्नदाता शेतकरी सुखी रहावा अशी प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे हे रूजवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
पुणे परिसरातील सर्व पुरोगामी चळवळीतील अनेक संघटना याठिकाणी एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतात. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बहुजनसमाज एकवटण्याचे महत्वाचे क ाम प्रतिष्ठान करत आहे असे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. पुण्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित राहण्याचे व कार्यक्रम  सर्वांसाठी खुला असून विनामूल्य प्रवेशिकांसाठी 9823627744 व 9823781144 वर संपर्क साधण्याचे आवाहन शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञेश मोळक यांनी केले आहे.