Breaking News

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - पुण्यातील सिंहगड रोडवरील दत्तवाडी परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. पु.ल. देशपांडे गार्डन समोरील नवशा  मारुतीच्या जवळ पाटे डेव्हलपर्सच्या सैया इमारतीचे काम सुरू असताना आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. मृत्यू झालेले कामगार दहाव्या मजल्यावर स्लॅबचे  सेंट्रिंग काढण्याचे काम करत होते त्यावेळी सेंट्रिंग कोसळल्याने ही घटना घडली.प्रकाश साव (वय -26), दुलारी पासवान (वय मिथुन सिंग (वय-22) या कामगारांचा मृत्यू झाला  तर रामु पासवान (वय -24 सर्व राहणार-झरखंड) हा कामगार जखमी झाला असून त्याच्यावर दत्तवाडीतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील एक महिण्यापासून ते  या साईटवर काम करत होते.ऐन दिवाळीत ही दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.स्थानिक नगरसेवक शंकर पवार यांनी सांगितले की , संबंधित बिल्डरकडून कोणत्याही प्रक ारचे संरक्षक साहित्य वापरले जात नव्हते. या आधी बांधकामाच्या बाहेर अपघात झाले आहे. या बाबत अनेक वेळा बिल्डरला सांगूनही काळजी घेतली गेली नाही. निष्काळजी  बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जावी.दरम्यान साधारण वर्षभरापुर्वी पुण्यातील बालेवाडी येथे अशीच घटना घडली होती. बालेवाडी येथील पार्क  एक्स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून 9 जण ठार झाले होते. महापालिकेने बारा मजल्यांचीच परवानगी दिलेली असताना कायदा धुडकावत तेराव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम सुरू  असताना ही घटना घडली होती.