Breaking News

एका महिन्यात 80 टक्के शेतकर्‍यांचे कर्ज माफ होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 18, ऑक्टोबर - राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 18 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून एका महिन्यात 80 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा  लाभ मिळेल , अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली . 
आपल्या वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली . उर्वरीत 20 टक्के शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यातील ज्या अडचणी आहेत त्याही लवकरच दूर के ल्या जातील , असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले .
मुख्यमंत्री म्हणाले की , शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यामुळे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडणार आहे . या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने वेगळा मार्ग  अवलंबला आहे . अलीकडेच पेट्रोल , डिझेल वरील व्हॅट कमी करावा लागल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत 3 हजारांची घेत होणार आहे . अशा स्थितीतही राज्य सरकारने शेतक र्‍यांना कर्जमुक्त करण्याचा शब्द पाळला आहे .
कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवल्याने या योजनेचा कोणालाच गैरफायदा घेता आलेला नाही . शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज दाखल के ले . बँकांकडून कर्जदार शेतकर्‍यांची माहिती मागविण्याऐवजी थेट शेतकर्‍यांकडून अर्ज मागवल्याने या योजनेचा लाभ गरजू, गरीब शेतकर्‍यांनाच मिळू शकणार आहे , असेही  मुख्यमंत्र्यांनी नमूद केले .
बेस्ट आणि एस टी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत आपली संबंधितांशी चर्चा झाली असून या दोन्ही संपांवर लवकरच तोडगा निघेल असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला .
गर्रमपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केली असून भाजप समर्थक सरपंचांचा लवकरच मेळावा आयोजित केला जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सां गितले .